जि. प. उ. प्राथमिक शाळा हरांबा येथे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांना निवेदनv

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
सावली तालुक्यातील जीबगाव केंद्रा अंतर्गत येत असलेल्या हरांबा येथील जि. प. उ. प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत,या वर्गाकरिता यापूर्वी एकूण नऊ शिक्षक असायचे, पण मागील काही वर्षांपासून फक्त सहा शिक्षकच अध्यापणाचे कार्य करित आहेत.
विशेष बाब ही आहे की,इयत्ता 5 वी इयतेला मागील दोन वर्षांपासून वर्गशिक्षक स्वरूपात नाही,त्यामुळे सर्व शिक्षक मिळून त्यांचा अभ्यासक्रम घेत होते.
आणि सद्यस्थितीत शिक्षकांच्या शासन स्तरावरून बदली झाल्याने शाळेला फक्त एक शिक्षक उरलेले आहेत, आणि दोन शिक्षक बदली होऊन शाळेला रुजू झालेले आहेत, त्यामुळे फक्त तीन शिक्षकांवर 221 विद्यार्थ्यांची जबाबदारी येऊन पडल्याने शिक्षकांवर अतिरिक्त भार पडला आहे.
सदरील बदली प्रक्रियेने हरंबा शाळेतील शिक्षकांना नवीन शिक्षक रुजू होई पर्यंत ठेवणे बंधनकारक होते मात्र याकडे दुर्लक्षित करण्यात आले, व बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले, यामुळे आज तीन शिक्षकांवर इयत्ता 1 ली ते सातवी ची जबाबदारी येऊन पडलेली आहे.
सदर शाळेत अध्यापन करण्यासाठी शिक्षकांची कमतरता असल्याने पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती मार्फत गट शिक्षणाधिकारी व गट विकास अधिकारी सावली यांना निवेदनातून लवकरात लवकर शिक्षक शाळेला मिळतील यासाठी मागणी पत्र देण्यात आले आहे.
यावेळी उपसरपंच प्रवीण संतोषवार,ग्रामपंचायत सदस्य हर्षकुमार डोईजड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश जामपलवार,उपाध्यक्ष, अश्विन बोदलकर,सदस्य सुधीर शेंडे,मुकेश डोईजड गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,
					
					
					
					
					


