ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपक्रमशील विद्यार्थी हेच राष्ट्राचा गौरव – शंतनु धोटे

इन्फट जिसस सोसायटी तर्फे स्वातंत्र्योत्सव उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

भारतीय स्वातंत्र्योत्सवानिमित्त इन्फट जिसस सोसायटीच्या सर्व संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ठिक ७ : ४५ वाजता ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वजाला परेड मार्च द्वारा मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात विविध देशभक्तीपर गीत, नृत्य सादर केले. आ. धोटे यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे संचालक तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, भारतीय स्वातंत्र्याचा अभिमान सर्वांनी बाळगला पाहिजे. स्वातंत्र्य योद्ध्यांपासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावरील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व अन्य सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नैत्रदिपक प्रगती करावी. खऱ्या अर्थाने उपक्रमशील विद्यार्थी हेच राष्ट्राचा गौरव आहेत. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

        या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, मुख्य अतिथी संस्थेचे संचालक तथा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, जुनियर काॅलेजचे प्राचार्य समिर पठाण, कल्याण काॅलेज आॅफ नर्सिग च्या प्राचार्या पुजा गीते, इन्फट जिसस इंग्लिश हायस्कूल चे मुख्याध्यापिका सिमरन कौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अंसारी आदि मान्यवर उपस्थित होते.

           कार्यक्रमाचे संचालन संतोष सागर यांनी तर आभार प्रदर्शन सुशिल वासेकर यांनी केले. या प्रसंगी राजुरा शहरातील अनेक गनमान्य नागरिक, पालक वर्ग, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये