नांदा येथे प्रधानमंत्री मोफत धान्यापासून शिधाधारक वंचित
चौकशी व कार्यवाहीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रमोद गिरडकर
कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर म्हणून नांदा गावची ओळख असून येथिल स्वस्त धान्य दुकानाला राजुरगुडा व लाल गुड़ा ही १००% आदिवासी .सिधा धारक लाभार्थी या धान्य वितरण केन्द्राला जोड़ले आहे तसेच औद्योगिक शहर असल्याने भुमिहीन शेतमजुर कामगाराची संख्या मोठी आहे.
नांदा येथिल दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द झाल्याने आसन (खु) येथिल सुरेश राऊत यांच्या दुकानाला प्रयायी व्यवस्था म्हणून दुकान संलग्नीत करण्यात आले मात्र धान्य वितरण करण्यापूर्वी हाताचे थम घेऊन ग्राहकाना धान्य दिल्या जात नव्हते अनेक वेळा धान्य कमी आले म्हणून ग्राहकाना धान्य संपल्याचे कारण देत परत करत होता गेल्याचार महिण्या पासून शिधा धारकाना प्रधानमंत्री मोफत धान्य वितरणन करता धान्यवितरणात गैरव्यवहार करुण नांदा व आसन दुकानात पॉस मशीन व प्रत्यक्ष वितरण या मध्ये मोठी तफावत असुन १५० किव्टंल तांदूळ गहु हेराफेरी करुण ग्राहकाना दिल्या गेले नाही यामुळे शिधा धारकाची फसवणूक केली आहे पुर्वी या दुकानराताचे अनेक तक्रारीवर जिल्हा पूरवठा अधिकारी तहसिलदार यांनी कार्यवाही करूण अनामत रक्कम जप्त करूण दंडात्मक कार्यवाही केली असताना या गावाच्या दुकानासाठी अर्ज मागविण्यात आले प्राप्त अर्ज ग्रामसभेत सिफारस करीता ठेवण्यात आले.
मात्र व्यापक प्रसिद्धी व ग्रामसभेची महीलाना माहिती दिली नाहीं व ज्या वार्डतील शिधाधारक आहे यांना माहिती न देता स्वस्तधान्य दुकानदार राऊत यांनी आपल्या सुनबाई संगीता महेश राऊत धनश्री महीला स्वयंम सहाय्य समुह नांदा येथिल सदस्य व इतर वार्डातील महीला गोळा करूण अधिक प्रसार प्रचार चर्चा न होऊ देता आपल्या सोयीनुसार ठराव पारित करूण घेतल्याचा आरोप शिधाधारक कुंटूबानी केला असून ज्याच्या सासरे सुरेश राऊत यांनी गैरव्यवहार व पूर्वी कार्यवाही झाली असताना त्याच कुंटूबात दुकान देण्यात येऊ नये अशी भुमीका शिधापत्रक धारकानी केली असून तहसीलदार यांना निवेदन देऊन चौकशी व कार्यवाहीची मागणी केली आहे