क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस स्टेशन वडनेर हद्दीत दारूबंदी कायद्याने कार्यवाही

एकूण ७ लाख ३० हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. ८.०७.२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धेचे पथक हिंगणघाट डिव्हिजन मध्ये अवैद्य धंद्यांवर कारवाई संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, यवतमाळ येथून वडकी मार्गे एक महिंद्रा बोलेरो गाडी चा चालक टी.पी असलेला देशी दारूचा माल घेऊन नागपूरकडे जात आहे व तो सदरचा माल हा शासकीय नियम, कायदे व कराराचे उल्लंघन करून वडनेर येथे राहणारा संगत जुनी याला वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या विक्री करण्यासाठी मौजा पोहणा शेतशिवारात देशी दारूचा माल देणार आहे अशा खात्रीशीर माहिती वरून त्यांचेवर नाकेबंदी करून छापा कार्यवाही केली असता. संगत जुनी हा त्याचे ताब्यातील ब्रेजा गाडीने बोलेरो गाडीचे चालकासह घटनास्थळावरून पसार झाला सदर बोलेरो पिकप क्रमांक एम एच 40.बी.एल 2668 ची पाहणी केली असता नमूद बोलेरो पिकप मध्ये 1) देशी दारू नी भरलेल्या संत्रा गोवा कंपनीच्या 180 एम.एल च्या 31 खरड्याच्या खोक्यामध्ये 1488 सीलबंद शीशा प्रती 150/- रुपये प्रमाणे 2,23,200/- रुपये.
2) एक जुनी वापरते मालवाहू महिंद्रा बोलेरो गाडी क्रमांक एम एच 40 बी एल 26 68 किंमत 5,00,000/- रुपये. 3) एक अँड्रॉइड मोबाईल किंमत 7000/- रुपये. असा एकूण जु. किंमत 7,30,200/- रुपये चा माल जप्त करण्यात आला.आरोपी नामे 1) संगत जुनी रा वडनेर (पसार) 2) एम.एच 40.बी.एल 2668 महिंद्रा बोलेरो पिकप चा चालक यांचे विरुद्ध शासकीय नियम, कायदे व कराराचे उल्लंघन तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्था.गु.शा वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, पवन पन्नासे, नितीन इटकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये