ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवानिमित्त महिला बचत गटाचे प्रदर्शन

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने जिल्हा परिषद आवारात महिला बचत गट व स्वयंसहायता समुह गटाने विविध वस्तुंचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

सदर प्रदर्शन २५ ते २८ ऑगस्ट दरम्यान जिल्हा परिषद आवारात असणार आहे. या प्रदर्शनात ग्रामीण भागातील महिलांनी हस्तकलेने निर्मित केलेल्या शाडू मातीपासून गणपतीच्या मूर्ती, गणपतीचे डेकोरेशन, सजावटीच्या वस्तू यासोबतच घरगुती चविष्ट खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, पारंपारिक अलंकार, कपडे आणि सेंद्रिय उत्पादने यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यातील विविध स्वयंसहायता समूह यांनीसुध्दा प्रदर्शनात भाग घेतला असून नागरिकाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, ‘बचत गट हा महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने येणारा प्रभावी मार्ग आहे’ या प्रदर्शनास चंद्रपूरच्या जनतेने अवश्य भेट देऊन वस्तूची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. सदर प्रदर्शन २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये