श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे उदघाटन
भाग्यवान विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षिसे

चांदा ब्लास्ट
महानगरपालिकेतर्फे 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान चांदा क्लब येथे आयोजित करण्यात येणाऱ्या श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे सोमवार 25 ऑगस्ट रोजी सहायक आयुक्त अनिलकुमार घुले व सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मनपाद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनीचे व उपलब्ध सोयी सुविधेचे सहायक आयुक्त यांनी स्टॉल्सला भेट देत कौतुक केले.
सदर प्रदर्शनीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असुन दरवर्षी मूर्ती खरेदीचे हेच स्थान निश्चित राहावे अश्या भावना भेट देणारे नागरिक व्यक्त करीत आहेत. याप्रसंगी रफीक शेख,सिद्दिक अहमद,रोशनी तपासे,चिंतेश्वर मेश्राम, समुदाय संघटिका सुषमा करमनकर,रेखा पाटील, पांडुरंग खडसे, मून, लोणारे,जय पालीवाल तसेच सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
येत्या 27 ऑगस्ट पासुन गणेशोत्सवास सुरवात होत असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जावे लागते यावर उपाय म्हणुन चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन मनपातर्फे करण्यात आले आहे.
प्रदर्शनीत नागरिकांना एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार आहे.उत्सव काळात होणारी गर्दी वाहतूक कोंडी यामुळे निर्माण होऊ शकणार नसुन नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता येणार आहे शिवाय या मूर्तिकांरांकडून मूर्ती विकत घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असुन यातील 8 भाग्यवान विजेत्यांना घरगुती उपयोगी वस्तु स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत.त्यामुळे नागरिकांना इतरत्र कुठेही गर्दीच्या जागी न जाता मोकळ्या जागेत आपल्या परिवारासहित खरेदीचा आनंद घेता येत आहे.
अधिकाधिक नागरिकांना या प्रदर्शनीस भेट देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे