ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

1 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन  

ई-लोकशाही दिनाची सुविधा

चांदा ब्लास्ट

सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणींची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाय योजना म्हणून ‘लोकशाही दिन’ चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजीत केला जातो. सप्टेंबर महीन्यातील लोकशाही दिन, सोमवार 1 सप्टेंबर 2025 रोजी महानगरपालिका कार्यालयात मा. आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे.

    ज्या नागरिकांना प्रत्यक्षरित्या उपस्थीत राहणे शक्य नाही त्यांच्यासाठी मनपाने ई-लोकशाही दिनाची सुविधा करून दिली असुन यात त्यांना आपले निवेदन lokshahidincomplaint@gmail.com या ईमेल आयडी वर पाठविता येईल.लोकशाही दिन प्रसंगी अर्जदारांनी विहीत नमून्यातील दोन प्रतीत अर्ज सादर करावे. लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी अर्जदार अर्ज /निवेदन सादर करतील. अर्ज सादर केल्यानंतर संबंधीत विभागाकडे निवेदन कार्यवाही करीता पाठविण्यात येईल.

    संबंधीत विभागप्रमुख अर्जदाराला आपल्या स्तरावर निवेदनासंबंधी केलेली कार्यवाही किंवा चालु असलेली कार्यवाही याबाबत अवगत करतील,तसे विभाग प्रमुखाकडून न झाल्यास किंवा अर्जदाराचे समाधान न झाल्यास अर्जदारांना लोकशाही दिनामध्ये मा. आयुक्त यांचे कार्यालयात हजर राहून आपले म्हणणे सादर करता येईल. आयुक्त हे सदर अहवाल, अर्जदाराची विनंती, त्याबद्दलचे नियम, शासनाची भुमिका,तरतुदी या बाबींचा विचार करून योग्य निर्णय देतील.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये