ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी महाविद्यालयात मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली – स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी शिबिर सोमवार, दि. २५ ऑगस्ट २०२5 रोजी घेण्यात आले.

 या शिबीराचे आयोजन महाविघालयाचे प्राचार्य डॉ. ऐ चंद्रमौली यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, प्राणिशास्त्र विभाग आणि प्राथमीक आरोग्यकेंद्र जिबगाव यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. देवीलाल वताखेरे, डॉ. राजश्री मार्कंडेवार ,प्राणिशास्त्र विभागातील प्राध्यापक प्रा. प्रकाश घागरगुंडे व डॉ. किरण कापगते, डॉ सौरव गोबाडे वैद्यकीय अधिकारी, श्री दातार साहेब आरोग्य निरीक्षक व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ खोब्रागडे सर, प्रा. वासाडे सर, प्रा वाकडे सर व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपले योगदान दिले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अंकुश सोनुले, निशा कामनपेल्लीवार, साहिल गुंडावार, पृथ्वीक निकुरे, सुचिता गेडाम, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या रक्ततपासणी शिबिराचे फायदा 120 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी व कर्मचार्‍यांनी घेतला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये