घोडपेठ येथे आज बैलजोडी सजावट स्पर्धा
हंसराज अहीर यांची विशेष उपस्थिती

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : भाजपा शाखा-घोडपेठच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळ्याच्या शुभ मुहूर्तावर दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता, बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
घोडपेठ येथील भवानी माता मंदिराच्या पटांगणावर आयोजित या कार्यक्रमास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजभैय्या अहीर, वरोरा विधानसभेचे आमदार करण देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बॅंकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख इंजि. रमेश राजुरकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या या बैलजोडी सजावट स्पर्धेमध्ये घोडपेठ येथील शेतकरी बांधवांनी या आनंददायी सोहळ्यामध्ये बैलजोडीसह सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा घोडपेठ शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.