महात्मा गांधी विद्यालय येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथे माध्यमिक शालांत परीक्षा- 2025 मध्ये गुणवंत व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम दिनांक 14 मे रोजी बुधवारला आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे संचालक डॉ. अनिलराव चिताडे साहेब अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तथा प्राचार्य राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री धनंजय गोरे,संचालक श्री राहुल बोढे, संचालक श्री रामचंद्र सोनपितरे,मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम,उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे उपस्थित होते.सर्वप्रथम मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. माध्यमिक शालांत परीक्षा(एस. एस.सी.)- 2025 चा शाळेचा निकाल 92.34% लागला.एकूण 407 विद्यार्थ्यापैकी 374 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सात विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा ज्यास्त गुण संपादन केले तर एकूण 66 विद्यार्थी प्राविण्य प्राप्त श्रेणी पास झाले. शाळेतून प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम- समृद्धी भीमराव पाटील- 94%, द्वितीय -ओम प्रभुदास मरापे -93.20%, तृतीय- सानिका राजू गेडाम -92.80% तसेच सर्व 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणपत्रिका , सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात यावे यावेळी गुणवंत विद्यार्थी व पालक तसेच शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना अभिनंदनपर मार्गदर्शन श्री साईनाथ मेश्राम मुख्याध्यापक, श्री धनंजयजी गोरे सचिव, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अनिलराव चिताडे यांनी केले. महात्मा गांधी विद्यालय,गडचांदूरचे उपप्रचार्य श्री प्रफुल्ल माहुरे यांनी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले इंग्रजी पुस्तकाचे विमोचन करण्यात आले व तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्या प्रती देण्यात आल्या.कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षक प्रशांत धाबेकर यांनी केले व आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक नरसिंह पांचाळ यांनी केले