ब्रम्हपूरीत युवक काँग्रेसच्या वतीने १९ आॅगस्ट रोजी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे निमित्ताने ब्रम्हपूरी युवक काँग्रेसच्या वतीने दि. १९ आॅगस्ट रोजी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सवाचे प्रथम पारितोषिक १ लाख ११ हजार १११ रूपये तर द्वितीय पारितोषिक ५५ हजार ५५५ रूपये ठेवण्यात आला असुन या बक्षिसांचे प्रायोजक विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे आहेत.
यावेळी डीजे अलायशा हे प्रमुख आकर्षण यावेळी असणार आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, विधीमंडळ काॅंग्रेस गटनेते, आमदार विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून काॅंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी या दहीहंडी उत्सवाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.