ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाऊंची दहीहंडी आणि भव्य वेशभूषा स्पर्धा उद्या चंद्रपूरमध्ये

दहीहंडीसाठी गोविंदा पथकांना रु. १,५१,००० चे प्रथम पारितोषिक, लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धेचेही आयोजन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील नागरिकांना एक मोठा आणि उत्साहपूर्ण उत्सव अनुभवता यावा यासाठी ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार’ यांच्या वतीने उद्या, १७ ऑगस्ट २०२५ रोजी ‘भाऊंची दहीहंडी उत्सव’ आणि लहान मुलांसाठी ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे पार पडणार असून, याचे आयोजन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

दहीहंडीचा मुख्य कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता सुरू होईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी प्रथम पारितोषिक म्हणून रु. १,५१,००० रोख रक्कम आणि एक आकर्षक चषक ठेवण्यात आले आहे.

या उत्सवामध्ये ५ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेष ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’ देखील आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे विषय ‘भारतीय संस्कृती’ आणि ‘भारतीय इतिहासातील महापुरुष’ असे आहेत. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील, ज्यात प्रथम बक्षीस रु. ५,०००, द्वितीय रु. ३,०००, तृतीय रु. २,००० आणि १० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.

या दोन्ही कार्यक्रमांविषयी अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी कृपया ७९७२३६९०४५ या क्रमांकावर संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः गोविंदा पथक आणि लहान मुलांना या उत्साही क्षणात सहभागी होण्याचे आणि कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये