Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आंबेडकरी आंदोलनात सक्रिय प्रहारी विचारवंत मा.एल.आर.बाली यांना श्रद्धांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

जालंधर येथील प्रख्यात आंबेडकरी चळवळीतले अग्रेसर राहून स्वतःला वाहून नेणारे सच्चे कार्यकर्ते ज्येष्ठ  साहित्यिकलेखकआंबेडकरी विचारवंत ,भीम पत्रिका या मासिकाचे संपादक तसेच समता सैनिक दलचे राष्ट्रीय कमांडर आदरणीय एल. आर. बाली यांचे ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनात त्यांनी हिरहिरीने भाग घेऊन स्वतःची नोकरी सुद्धा सोडून चळवळीमध्ये आणि बाबासाहेबांच्या विचारांना सर्व परी प्रसार करण्याकरिता स्वतःला झोकून घेतले .असे निर्भीड वक्तेनिर्भीड भीमसैनिकनिर्भीड साहित्यिक लेखक आदरणीय एल.आर.  बाली यांना श्रद्धांजली देण्याकरिता बल्लारपूर येथील विश्रामगृहात आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांनी शोकसभेचे आयोजन केले त्यामध्ये अध्यक्षस्थानी समता सैनिक दल चे मार्शल माननीय ताराचंद रायपुरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता भारत जी थूलकर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अरुण घायवान तसेच प्रकाश घायवानअशोक भावेप्रसाद चव्हाणविशाल डुंबेरेमनोहर दोटपेल्लीकृष्णमूर्ती रामटेके,प्रशांत सातकर,धर्मेंद्र गायकवाडदूरेश  तेलंगमधुकर उमरेईश्वर देशभ्रतार,  अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहून माननीय एल. आर. बाली यांच्या कार्यावर उजाळा देत दुःख व्यक्त केलं. बालीसाहेबांच्या अचानक निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील ही पोकळी कधीही भरून निघणार नाही असे विधान भारत थूलकर यांनी संबोधले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये