ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल विद्यानिकेतन हायस्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

चांदा ब्लास्ट – गणेश शेंडे, देवळी

 गुरुकुल विद्यानिकेतन हायस्कूल, देवळी यांचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी भोग हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर सचिन पावडे तसेच डॉक्टर स्मिता पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘पालकांना विद्यार्थ्यांना काय बनवायचे आहे यापेक्षा विद्यार्थ्यांना काय बनायचे आहे हे महत्त्वाचे आहे. याकरिता विद्यार्थ्यांचा कल ओळखून पालकांनी तशी संधी उपलब्ध करून द्यावी’, असे मत सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन पावडे यांनी व्यक्त केले. डॉक्टर स्मिता पावडे यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले.

स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व इतर लोकनृत्ये सादर केली. याप्रसंगी मागील वर्षी इयत्ता दहावी मध्ये तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यातून तृतीय आलेल्या कुमारी ऋतुजा आगलावे,महापारा अन्सारी, शृतिका भूजाडे, अल्फिया शेख, तसेच क्रीडा स्पर्धेतील नेहा भलावी, अतिश तूरक, सक्षम भारल या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे प्राचार्य श्री योगेश ढोरे यांनी प्रास्ताविकेतून शाळेच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी रुपेश ढोरे, प्रशांत ठाकरे, राकेश ढोरे, मनीष खडतकर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन रोशनी भांगे, कल्पना जुमडे, श्रद्धा कपूर यांनी केले तर आभारप्रदर्शन राजेश शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन गडेकर, सुरेंद्र पचारे, धीरज दांडेकर, वैशाली इस्कापे, धनश्री शिवरकर, प्रतिभा बजाईत, सरिता लुंगे, पामिनी मशारकर, शिवानी शेंडे, स्वाती झिबद, शलाका देशमुख, श्वेता आदमने, आरती काळे, पल्लवी कोल्हे, शृंगाली राऊत, राजकुमारी बावणे, सुप्रिया महाजन, सुवर्णा अंबूरे, मनीषा मूते, रुबीना शेख यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये