एनसीसी छात्र सैनिकांचे पथनाट्य ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो…’

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देवळी : 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील एनसीसी छात्र सैनिकांनी देवळी शहरातील मुख्य चौकात 18 नोव्हेंबर रोजी मतदार जनजागृती अभियानांतर्गत ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो…….’ हे पथनाट्य सादर करून मतदारांचे प्रबोधन केले.
एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली छात्र सैनिकांनी तसेच रासेयो स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच मतदारांना सक्षम उमेदवार निवडण्याबाबत जागरूक करण्याचा प्रयत्न केला. पथनाट्यातून पैसा, पक्ष, प्रलोभन, जात व धर्म यावर आधारित उमेदवार न निवडता उमेदवाराच्या योग्यतेला प्राधान्य द्या असे आवाहन करण्यात आले. देशाला चांगल्या लोक प्रतिनिधींची गरज आहे म्हणून सक्षम उमेदवाराला प्राधान्य द्यावे, असे प्रबोधन केले.
सदर पथनाट्यात सार्जंट कोमल शितळे, वैष्णवी कन्नाके, स्नेहा मडकाम, भूमिका कापसे, श्रुतिका गुढे, साक्षी पारिसे, सलोनी अजमिरे, दुर्गेश पोटे, विकी पेंदोरकर, उदय काळे, यश कांबळे, युवराज डफरे, रितेश सुरतकर व शितल आष्टकार या कलाकारांचा समावेश होता.
यशस्वीतेकरिता रोव्हर लीडर संतोष तुरक, अंडर ऑफिसर आदर्श नाईक, सार्जंट मनोज नेहारे, अंडर ऑफिसर सुप्रिया यादव, हर्षदीप झाडे व सौरभ साव यांनी प्रयत्न केले.