इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या (ओबीसी) अंतर्गत इतर मागास प्रवर्ग , भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 72 वस्तीगृह व २१६०० विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरू करण्यात येणार होती परंतु शैक्षणिक क्षेत्र सुरू झाले तरी वस्तीगृह व स्वाधार योजना सुरू न झाल्याने यासंदर्भात शिव ब्रिगेड संघटनेतर्फ अप्पर जिल्हाधिकारी व वने व सांस्कृतिक मंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन देत चर्चा केली . या शिष्टमंडळात शिवब्रिगेडचे अध्यक्ष सतीश मालेकर प्रवक्ते प्रलय मशाखेत्री आनंद अंगलवार कालिदासजी वाडके संतोष देरकर विशाल शेंडे अनिकेत दुर्गे अक्षय काकडे योगेश तूराणकर मनोज गिरटकर आधी पदाधिकारी सहभागी झाले होते दहावी व बारावीचे निकाल घोषित होऊन जवळपास एक महिना उलटला तरी इतर अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्याप्रमाणे ग्रामीण भागातील इतर मागास भटके विमुक्त विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी यावे लागते परंतु शहरात राहण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यामुळे ७२ वस्तीगृह त्वरित सुरू करण्याची मागणी तसेच एससी एसटी विद्यार्थ्याप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना त्वरित सुरू करावी अशी मागणी शिव ब्रिगेड संघटनेतर्फे करण्यात आली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला