ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रदीप जेऊरकर यांची मा.आ.सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्राला सदिच्छा भेट

चांदा ब्लास्ट
वणी तालुक्याचे भाजपा तालुकाध्यक्ष व पुनवटचे सरपंच प्रदीप जेऊरकर यांनी रविवारी येथे असलेल्या मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राला सदिच्छा भेट दिली.
या भेटीप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक स्वागत केले. प्रदीप जेऊरकर यांनी विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या कार्याची दखल यावेळी घेण्यात आली.
कार्यक्रमावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे नेते गणेश कुटेमाटे, असगर खान, संदीप तेलंग, अजय लेंडे, हनुमान खडसे, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार, प्रिया नागभीडकर, जाई आत्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.