ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पैसे भरले, जप्त केलेले ननगरपरीषदेचे साहित्य परत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            भद्रावती नगर परीषदेने आठवडी बाजारासाठी शहरातील राजु गुंडावार व संजय गुंडावार यांची जागा भाड्याने घेतली होती. सुरुवातीचे काही महिणे भाडे दिल्यानंतर नगरपरीषदेकडून भाडे थकविण्यात आले होते.याविरोधात गुंडावार यांनी न्यायालयात दाद मागीतली होती.न्यायालयाने गुंडावार यांचे तर्फे निकाल देत नगरपरीषदेचे साहित्य जप्त करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार गुंडावार यांनी नगरपरिषद कार्यालयातील साहित्या जप्त केले होते.

मात्र नगर परीषद कार्यालयातर्फे थकीत रकमेपैकी २५ लक्ष रुपयाचा धनादेश न्यायालयात जमा केल्यानंतर व उर्वरीत रक्कम दोन हप्त्यात देण्याचे नगर परिषदेतर्फे मान्य केल्यानंतर न्यायालयाकडून जप्त केलेले साहित्य परत करण्याचा आदेश काढण्यात आला.त्यानुसार दिनांक २८ ला न्यायालयाच्या बेलीफच्या ऊपस्थीत गुंडावार यांनी जप्त केलेले नगरपरीषदेचे साहित्य परत केले.भाजीमंडीच्या नव्या ईमारतीचे काम सुरु करण्यासाठी नगरपरिषदेने गुंडावार यांची जागा भाड्याने घेऊन भाजीमार्केट वसविले होते.काही महिणे भाड्याची रक्कम दिल्यानंतर भाडे चुकते करणे बंद करण्यात आले.यापोटी नगरपरिषदेकडे जवळपास साठ लाखाच्या वर रक्कम थकीत होती.वेळोवेळी मागणी करुनही रक्कम न मिळाल्याने गुंडावार यांनी न्यायालयात दाद मागीतली होती.

सध्या नगरपरिषदेकडून २५ लाखांचा धनादेश न्यायालयात जमा करण्यात आला असुन उर्वरित रक्कम दोन हप्त्यात चुकती करण्याचे आश्वासन नगरपरिषदेतर्फे देण्यात आल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त करण्यात आलेले साहित्य नगरपरीषदेला परत करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये