ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सैन्य दलाची दुसरी फळी म्हणजे एनसीसी छात्र सैनिक – ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास

ग्रुप कमांडर खुशाल व्यास यांची एनसीसी कॅम्पला भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेवाग्राम: ‘आज प्रत्येक क्षेत्रात चांगल्या नेतृत्वाची गरज आहे याकरता दर्जेदार प्रशिक्षण मिळाल्यास उत्तम नेतृत्व निर्माण होते या दृष्टीने एनसीसी सैनिकी प्रशिक्षण, समाजसेवा, साहस व कर्तव्यदक्ष नागरिक बनण्याचे प्रशिक्षण देते. म्हणूनच सैन्य दलाची दुसरी फळी म्हणजे एनसीसी छात्र सैनिक होय, असे प्रतिपादन नागपूर विभागाचे ग्रुप कमांडर ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास यांनी 13 नोव्हेंबर रोजी आपल्या भेटीदरम्यान एनसीसी छात्र सैनिकांसोबत संवाद साधताना स्थानिक बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात केले.

स्थानिक 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियनचा तिसरा वार्षिक कॅम्प बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या होस्टेल परिसरात सुरू असून यात 400 छात्र सैनिकांचा समावेश आहे. यावेळी कॅम्प कमांडंट कर्नल समीक घोष, प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नवनीत थापा व सुभेदार मेजर दिलबाग सिंग यांनी ग्रुप कमांडर खुशाल व्यास यांचे स्वागत केले. शिबिरातील छात्र सैनिकांनी ग्रुप कमांडर यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला. शिबिरातील सर्व सैनिकी प्रशिक्षणाचे निरीक्षण करून ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास यांनी एनसीसी छात्र सैनिकांसोबत संवाद साधला. आपल्या मार्गदर्शनात पुढे ते म्हणाले एनसीसी छात्र सैनिकांनी अधिकारी बनण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. एनसीसी एक चांगले माध्यम असून यातून लेखी परीक्षा न देता सरळ अधिकारी बनण्याची खूप चांगली संधी सैन्य दलात आहे. आदर्श नागरिक म्हणून एनसीसी छात्र सैनिकांनी आपले कर्तव्य निभावले पाहिजे. आज देशाला सर्वच क्षेत्रात चांगल्या व सक्षम तरुण-तरुणींची गरज आहे.

याप्रसंगी ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास यांनी एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, कॅप्टन प्रवीण ठाकरे, सेकंड ऑफिसर विक्रांत भागवतकर, सेकंड ऑफिसर श्री वैद्य व थर्ड ऑफिसर स्वप्निल आगाशे यांच्यासोबत संवाद साधून एनसीसी मध्ये असलेल्या उणीवा तसेच अधिक दर्जेदार प्रशिक्षण देण्याबाबत माहिती घेतली. शिबिराच्या यशस्वीतेकरिता सुभेदार हरिप्रसाद, सुभेदार रवींदर सिंग, बटालियन हवालदार मेजर भीमराव जाधव हवालदार श्री दुधे व सैन्य दलातील प्रशिक्षक प्रयत्न करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये