ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दिवंगत खा.बाळू धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त भद्रावती शहरात विविध कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची जयंती भद्रावती शहर तथा तालुका काँग्रेस तर्फे दिनांक चार रोज शुक्रवारला स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करण्यात आले.त्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते प्रेरणाअंध विद्यालयाला व्हॅन अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी चौकात भोजनदान देण्यात आले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, रवींद्र शिंदे, वसंता मानकर, मुनाज शेख,दिनेश चोखारे,मानस धानोरकर, पार्थ धानोरकर, प्रवीण काकडे, धनंजय गुंडावार, सुरज गावंडे, प्रशांत काळे, शेख तनवीर,प्रवीण महाजन, सुधीर खोब्रागडे ,सरिता सूर,सुनीता खंडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.