ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शहरात परतलेल्या भारतीय सेनेचे निवृत्त सैनिक संदीप नागपुरे यांचे भद्रावतीत जंगी स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भारतीय सैन्य दलाचे मुख्यालय दिल्ली येथून निवृत्त झालेले लष्करी नायक संदीप अशोकराव नागपुरे यांचे मंगळवार दि.१जुलै रोजी त्यांच्या मूळ गाव भद्रावती येथील चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे त्यांच्या मित्र परिवार तसेच जय जवान फाउंडेशन,भोई समाज, श्री संत झिंगुजी महाराज देवस्थान समिती, श्री वाल्मीक आखाडा तर्फे भव्य स्वागत करण्यात आले.

   स्थानिक मित्रपरिवार,जयहिंद फाउंडेशन आणि त्यांचे चाहत्यांनी बाजारात तिरंगा यात्रा काढून त्यांचे स्वागत केले.त्यानंतर देशभक्तीपर गीतांच्या ढोल ताशांच्या गजरात भद्रावती शहराच्या मुख्य मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. भोज वार्डातील अशोकराव नागपुरे यांचा मुलगा संदिप नागपुरे यांनी त्यांच्या १६ वर्षाच्या सेवाकाळात चंदीगड मधील चांदिमंदिर कॅट, बारा मुल्ला जम्मू कश्मीर येथील राष्ट्रीय रायफल बटालियन, जोधपुर मधील 12 कोर सिग्नल रेजिमेंट, सतवारी जम्मू येथे २६ इन्फंट्री डिव्हिजन सिग्नल रेजिमेंट आणि शेवटी दिल्ली येथील आर्मी हेडक्वार्टर येथे सेवा देऊन देशाचे रक्षण केले. भद्रावती शहरातील नागरिकांनी व चाहत्यांनी फुलांचा वर्षाव करून त्यांचे सपत्नीक भव्य स्वागत केले. डीजेच्या तालावर शहरात मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर स्थानिक श्री बालाजी सभागृहात सेवापुर्ती अभिष्टचिंतन सोहळा घेण्यात आला.

शहरातील महिलांनी फुले उधळली, आरती केली आणि तिलक लावला.याप्रसंगी सेवानिवृत्त नायक संदिप यांचा अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी त्यांच्या चाहत्यांनी आप आपल्या मनोगतातून त्यांचा गौरव केला.

शेवटी संदीपने आपले मनोगत व्यक्त करीत म्हणाले मी १६ वर्षे भारत मातेची सेवा केली. नंतरच्या आयुष्यात मिळणाऱ्या सेवेसोबतच आता गावात राहून माझ्या कुटुंबाची व समाजाची समाजसेवा करणार असेही ते म्हणाले.याप्रसंगी भद्रावतीचे नगरसेवक नंदूभाऊ पढाल,पत्रकार दिलीप ठेंगे, जय फाउंडेशनचे माजी सैनिक विजय करमनकर,अजित राम,अशोक देठे,नामदेव मांडवकर,माजी सैनिक खुशाल मस्के, सामाजिक कार्यकर्ते मनोहर नागपुरे, मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष दिलीप मांढरे,भारत नागपुरे,वडील अशोक नागपुरे, आई जिजा नागपुरे,पत्नी शितल नागपुरे,मुलगा रेयांश नागपुरे,सागर नागपुरे व शुभम नागपुरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन रवींद्र नागपुरे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये