करगाव ग्रामपंचायत सचिवावरील भ्रष्टाचाराची तक्रार
चौकशी अधिकाऱ्यांच्या दिरंगाईने अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
करगाव ग्रामपंचायत सचिवा विरोधात भ्रष्टाचाराची ग्रामकमेटीचा वतीने लेखी तक्रार करण्यात आली असूनही संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशीस विलंब होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तसेच ग्राम कमिटी कडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सावली तालुक्यातील करगाव ग्रामपंचायत ही सात सदस्य असून ग्रामसेवक म्हणून अमोल मेश्राम कार्यरत आहेत परंतु मेश्राम यांनी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने निधी खर्च करून 15 वा वित्त आयोग निधीतुन जवळपास पाच ते सहा लाख रुपये परस्पर खर्च केल्याचे निदर्शनास आल्याने तसेच ग्रामपंचायतच्या मासिक सभेत विषयसूचीत विषय न घेता व कुठेही ठराव न घेता रकमेची अपराथपर केली असल्याची बाब समोर येताच ग्राम कमिटीच्या वतीने दिनांक 23 /6/ 2025 रोजी संबंधित अधिकाऱ्यांना यांची तक्रार करण्यात आली होती परंतु तक्रार दाखल होऊन एक महिना उलटून गेला असून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करूनही ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांवरचा कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत असल्याचे ग्रामस्थात बोलले जात आहेत त्यामुळे ग्रामपंचायतचा सचिवावरील भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशीअंती कारवाईस विलंब होत असल्याने गावकरी तसेच ग्राम कमेटी मार्फत अधिकाया विरुद्ध असंतोष वाढत आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी पारदर्शक सखोल चौकशी करून ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ व ग्राम कमिटी करून केली जात आहे.
ग्रामसेवकांनी 15 वा वित्त आयोगाचा निधीतून लाखोनी रक्कमेची अफरातफर केल्याची तक्रार करून एक महिना लोटूनसुद्धा कारवाई थंडबसत्यात असल्याने अधिकायांचाच हात ग्रामसेवकांचा डोक्यावर असल्याचे नागरिकांत बोलले जात आहेत त्यामुळे त्वरीत चौकशी करून कारवाई करण्यात यावी.
“धनराज लांडगे”
उपसरपंच करगाव.