आयटीआय निदेशकांच्या समस्यांबाबत सकारात्मक बैठक
आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने अपर मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक
चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी विविध मागण्यांसंदर्भात पुकारलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार श्री. सुधाकरजी अडबाले यांच्या विशेष प्रयत्नांनी व प्रमुख उपस्थितीत खात्याच्या अप्पर मुख्य सचिव सन्माननीय श्रीमती मनिषा वर्मा मॅडम यांनी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेसोबत विविध मुद्द्यांवर बैठक आयोजित केलेली होती.
सदर बैठक प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे संध्याकाळी ५ ते ६.३० या वेळेत यशस्वीरित्या पार पडली. यावेळी नागपूर विभागाचे पदवीधर आमदार सन्माननीय श्री अभिजितजी वंजारी सुद्धा पूर्णवेळ उपस्थित होते.
बैठकीला संचालक श्रीमती माधवी सरदेशमुख तसेच उपसचिव श्री मठपती, सहसंचालक श्री. सूर्यवंशी, श्री गावित साहेब (ऑनलाइन) हे चर्चेत उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशनावरील एक दिवसीय धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेने शासनास दिलेल्या पत्रात असलेल्या सर्वच तेराही मुद्द्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. मा. अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा मॅडम यांनी सर्व मुद्दे एक – एक करून संघटना, संचालनालय आणि मंत्रालय स्तर यामध्ये नेमके कुठे समस्या निवारणार्थ उपाययोजना आवश्यक आहे आणि किती कालावधीत उपाययोजना व्हावी, याबाबत कालमर्यादेत प्रश्न मार्गी लागण्याच्या दृष्टीने योग्य ते निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दोन्ही सन्माननीय आमदार महोदयांनी सुद्धा संघटनेची न्यायिक बाजू मांडली.
यावेळी सन्माननीय अप्पर सचिव मॅडम यांची प्रशिक्षण योजनेमधील सुधारणा आणि प्रशिक्षणार्थी कल्याण याविषयीची कळकळ वेळोवेळी जाणवून आली. त्यांनी यावर आवाहन करताच संघटना केवळ प्रशिक्षण याविषयावरच समर्पित एक बैठक आपणासोबत घेण्यास इच्छुक असल्याचे सांगताच त्यांनी लवकरच ही बैठक आपण आयोजित करू असे आश्वस्त केले. एकंदरीतच दीड तास चाललेल्या या बैठकीत अनेक समस्या निवारणार्थ निर्णय घेण्यात आलेले असून त्यादृष्टीने गतीने पावले उचलण्यात येतील याबद्दल अपर मुख्य सचिव यांनी आश्वस्त केले.
बैठकीनंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी मागील वर्षभरातील सभागृहातील कार्याची आढावा घेणारे “सुधाकरपर्व” पुस्तक अपर मुख्य सचिव वर्मा मॅडम यांना भेट दिले.
महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या वतीने संघटनेचे मार्गदर्शक, माजी सरचिटणीस तसेच नॅशनल फेडरेशनच्या Advisory Board चे अध्यक्ष श्री भोजराजजी काळे, माजी सरचिटणीस श्री दुर्गपुरोहित, अमरावती शिक्षक मतदार संघाचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत उमेदवार श्री दिलीपजी कडू, राज्य अध्यक्ष श्री विनोदजी पाटील, राज्य सरचिटणीस श्री राजेशजी खडबडे, राज्य उपाध्यक्ष श्री संजयकुमार खर्चे, राज्य सहचिटणीस श्री शिवाजी ढुमने, राज्य सहचिटणीस श्री मंगेश पुंडकर, राज्य खजिनदार श्री प्रवीणजी वाइनदेशकर, राज्य कार्यकारिणी सदस्य साहेबराव गुडधे, राज्याच्या महिला सदस्य श्रीमती शर्मिला कळमकर, नागपूर विभागाचे श्री प्रेमकुमारजी भैसारे, पुणे विभागाचे अध्यक्ष श्री नेताजी दिसले, अमरावती विभागाचे श्री राहुल चौधरी, नागपूर विभागाचे सचिव श्री सचिन मालिचकर, सचिव श्री सिद्धार्थ मेहरे, श्री धीरज सव्वालाखे आदींची उपस्थिती होती.



