ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे सीसीटीव्ही कॅमेरे व कर्मचाऱ्यांसाठी थम मशीन बसवा
जय शिवसंग्राम संघटनेची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरात व आजूबाजूच्या खेड्यामध्ये सध्या तापाचे व सर्दी खोकल्याचे रुग्ण जास्त वाढत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा मध्ये रुग्णासाठी कोणतीही सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे ओ पी टी सुरू झाल्यानंतरही काही डॉक्टर अर्धा तास किंवा एक तास उशिरा येत आहे, यामुळे रुग्णाला तपासण्यात उशीर होत आहे , समाजसेवकांनी ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे भेट दिली असता तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नाही, त्यांना कधीही फोन द्वारे माहिती घेतली ते मीटिंगमध्ये असते.
कुठे बाहेरगावी विजिटला असते. खेड्यातील व शहरातील गोरगरीब रुग्णासाठी ग्रामीण रुग्णालय हेच आधार असते त्यातही रुग्ण थोडाही क्रिटिकल (इमर्जन्सी) असला की त्याला रेफर टू जालना पाठवून देतात, येथील डॉक्टर व कर्मचारी निवांत होऊन जातात. तालुका वैद्यकीय अधिकारी साहेब यांचा वचक राहिलेला नाही. तरी ग्रामीण रुग्णालय ने सीसीटीव्ही कॅमेरे व कर्मचाऱ्यांसाठी हाजेरी थम मशीन लवकरात लवकर बसवावी. अन्यथा जय शिवसंग्राम संघटना लोकशाही मार्गाने रुग्णासाठी तीव्र रूपाचे आंदोलन करण्यात येईल यातून उद्भवणाऱ्या प्रत्येक परिणामाची जबाबदारी ही ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा याची राहील असे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक साहेब जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांना देण्यात आले.
निवेदनावर जहीर खान पठाण तालुकाध्यक्ष, अजमत खान शहराध्यक्ष, शंकर वाघमारे युवक शहराध्यक्ष, मुबारक चाऊस, शेख इम्रान, असलम खान, साजिद खान, अनिस शहा, राजेश भाग्यवंत, राजू गव्हाणे, यांच्या स्वाक्षरी आहेत