विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे जिल्हास्तरीय रोजगार मेळावा
16 नामांकित उद्योग कंपन्यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे दि. 15 जुलै २०२५ रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर व मॉडेल करिअर सेंटर तसेच विवेकानंद महाविद्यालय भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त दिनांक 15 जुलै 2025 रोजी जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजण करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध पदांकरिता दहावी पास ग्रॅज्युएट, डिप्लोमा इंजीनियरिंग, आयटीआय इत्यादी सर्व प्रकारच्या शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांसाठी भरपूर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
याशिवाय स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती यावेळी उमेदवारांना दिली जाईल. एकूण 16 नामांकित उद्योग कंपन्या याप्रसंगी येऊन या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व इच्छुक उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याच्या अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोराचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तम स्वान, सचिव श्री अमन टेमुर्डे आणि महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर आष्टूनकर हे कळवितात.