Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

कोंडेगाव येथे कोंबड बाजारावर धाड

भद्रावती पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे भद्रावती तालुक्यातील कोंडेगाव शिवारात भद्रावती पोलिसांनी सुरू असलेल्या कोंबड बाजारावर धाड मारीत एकूण सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून 4660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई भद्रावती पोलिसांनी तालुक्यातील कोंडेगाव शिवारात दिनांक सात रोज मंगळवार ला सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास केली.

कोंडेगाव शिवारात कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक केदारे यांनी महेंद्र बेसेकर, जितेंद्र पराते, संतोष कावडे, भारत पुसांडे, शंकर घुगे यांना घेऊन कोंबड बाजारावर धाड टाकली. यात आरोपींकडून झुंजीसाठी वापरण्यात आलेले कोंबडे व रोख असा 4660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये