ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रथमच नागपूर येथे मोठया दिमाखात संपन्न झाले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

नारायण विद्यालय सोमलवाडा, नागपूर येथे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रथमच नागपूर शहरात मोठ्या दिमाखाने संपन्न झाले. हे संमेलन मराठी साहित्य मंडळ नागपूर विभाग या नामांकित संस्थेने घडवुन आणले. सकाळी ग्रंथदिंडी मोठ्या थाटामाटात छत्रपती चौक ते कार्यक्रम स्थळ पर्यंत काढण्यात आली,देशभरातील अनेक नामवंत साहित्यकार या दिंडीत सामील होते.

त्यानंतर संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री, राजे रघोजीराजे भोसले , गिरीश पांडव , डॉ वर्तीका पाटील मिसेस यूनिव्हर्स , समाजसेवक रामनारायण मिश्र , संमेलनाध्यक्ष डॉ रेखा जगनाळे मोतेवार , ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ रविंद्र शोभणे , मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ जय प्रकाश घुमटकर , राष्ट्रीय उपाध्यक्षा सौ ललिता गवांदे , विदर्भ प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कुलकर्णी , विदर्भ प्रांतपाल इंजिनियर प्रविण उपलेंचवार , पूर्व विदर्भ अध्यक्ष श्री नरेंद्र मोहिते ,नागपूर जिल्हा अध्यक्ष सौ नीता चिकारे , नागपूर शहर अध्यक्ष डॉ रमणीक लेंगुरे , शहर उपाध्यक्ष मनीष उपाध्ये व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. नरेंद्र मोहिते यांनी छान प्रभावी पणे आपले मनोगत व्यक्त केले.प्रविण उपलेंचवार यांनी सुंदर शैलीत मंडळाच्या स्थापनेचा उद्देश व त्याचा अल्पावधीतच झालेला विस्ताराची माहिती आपल्या अमोघ वाणीने व काव्य सादर करून मांडली. श्री सिद्धार्थ कुलकर्णी यांनी आपला हिन्दी चित्रपट सृष्टीत काम करण्याचा अनेक वर्षांचा अनुभव छान रित्या सांगितला.

सुप्रसिद्ध साहित्यकार डॉ जय प्रकाश जी घुमटकर यांनी मंडळाची कार्यरचना व राबविण्यात येणार विविध कार्यक्रमाची सविस्तर माहिती अत्यंत रोचक पणे दिली. साहित्यिक रविंद्र शोभणे यांनी साहित्य मंडळाने कुठले उपक्रम राबविण्यात यावे याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. राजे रघोजी भोसले यांनी संमेलनाचे उदघाटन करून मराठी साहित्य संमेलनाची व्याप्ती विदेशात पण जावी असे नमूद केले. स्वागताध्यक्ष पंडित अग्निहोत्री यांनी आपल्या मधुर शब्दात व गोड वाणीने अशा साहित्य संमेलन आयोजित करणार्‍या मंडळाच्या मागे संपूर्ण समाजाने उभे राहणे आवश्यक आहे असे पटवून दिले. खूप सुंदर दिसणार्‍या डॉ वर्तीका पाटील मिसेस यूनिव्हर्स कार्यक्रमात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होत्या. संमेलनाध्यक्ष डॉ रेखा जगनाळे मोतेवार यांनी दिवसेंदिवस मराठी भाषेचा र्‍हास होत असून तिची अवनती होत आहे हे सत्य विषद केले .व मराठी माणूसच हा आजकाल मराठी भाषेचा वापर कमी करतो असे आपल्या अध्यक्षीय भाषणात आपल्या सहज शैलीने नमूद केले.

कार्यक्रमात पंडित शंकर प्रसाद अग्निहोत्री यांना सावित्रीबाई फुले विद्या भूषण पुरस्कार , डॉ रविंद्र शोभणे यांना सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार , प्रा.मधुकर उपलेंचवार यांना सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार व इतराना विविध व साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार देण्यात आलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लता हेडाऊ यांनी केले. मनीष उपाध्ये रचित सुंदर स्वागतगीत सौ रसिका बावडेकर यांनी आपल्या सुंदर आवाजात म्हंटले.
दुपारच्या परिसंवाद सत्रात डॉ नीता बोडके व डॉ घनश्याम पांचाळ यांनी समान नागरिक कायदा कसा अत्यावश्यक आहे हे अतिशय अभ्यासपूर्ण व प्रभावी शैलीने मांडले. त्या नंतर झालेल्या कवि संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नामवंत सुमारे बत्तीस कविंनी आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कविता सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. सरतेशेवटी विदर्भ प्रांतपाल इंजिनियर प्रविण उपलेंचवार यांनी मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानले. व कार्यक्रमाची सांगता झाली.

हे संमेलन अशा सुंदर रित्या यशस्वि होण्यासाठी प्रविण उपलेंचवार , नरेंद्र मोहिते , रमणीक लेंगुरे , नीता चिकारे यांनी व त्यांच्या संपूर्ण चमूने कित्येक महिने प्रचंड अहोरात्र काम सिद्धार्थ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली केले. अशा रीतीने नागपूर या भारताच्या मध्यवर्ती शहरात पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत यशस्वी पणे पार पडले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये