ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पूरग्रस्तांच्या निधीचा धनादेश मा. गटशिक्षणाधिकारी श्री कल्याण जोगदंड यांच्या वतीने गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे यांना सुपूर्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महाराष्ट्रात सर्वत्र ओला दुष्काळ पडला असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गोष्टीची जाणीव ठेवून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथील विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊचे पैसे व आपल्या मित्रांसोबत गावात फिरून 2517 रुपये जमा केले असून सदरील जमा रक्कम ही मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविण्याचा विद्यार्थ्यांचा मानस होता.

त्या दृष्टीने त्यांनी सदरील रक्कम जमा करून बँक खात्यात जमा करून धनादेशाद्वारे ही रक्कम पंचायत समिती कोरपणाचे गटशिक्षणाधिकारी श्री कल्याण जोगदंड यांच्या वतीने गटविकास अधिकारी श्री श्रीकांत बोबडे यांना आज सुपूर्द केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रतिनिधी स्वरूपामध्ये शालेय मंत्रिमंडळाचे विद्यार्थी वास्तव्या शेडमाके, सलोनी झाडे, आराध्या पाचभाई, अथर्व धोटे, सिद्धेश्वरी कोलांडे, अन्वय कुचनकर उपस्थित होते. शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्री काकासाहेब नागरे उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये