ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ कृषी महाविद्यालया मध्ये भव्य रक्तदान शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे श्री स्वामी समर्थ ब्लड बँक जालना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मा. आमदार मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यादरम्यान विद्यार्थी तसेच प्राध्यापक यांनी यामध्ये भाग घेतला.

शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. नंदाताई कायंदे, सचिव सतीश कायंदे यांच्या हस्ते झाले. रक्तदानाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी सांगितले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. आपणही दर तीन महिन्यांनी रक्तदान करून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. “रक्त द्या, जीवन वाचवा” हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणे हे आपलं कर्तव्य आहे. रक्तदान हे अत्यंत पुण्याचे आणि मानवतेचे कार्य आहे. रक्त हे कोणत्याही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही, त्यामुळे गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास दुसऱ्या व्यक्तीने दिलेलं रक्तच उपयोगी पडतं. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. दरम्यान २६ रक्त दात्त्यांनी रक्तदान केले.

सदर रक्तदान शिबिरास संस्थेचे, सचिव सतीश कायंदे डॉ. विजया कायंदे, सौ.वर्षा कायंदे तसेच प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, रा.स.यो कार्यक्रम अधिकारी अश्विनी जाधव प्रा.उषा जायभाये, प्रा. श्वेता धांडे, प्रा. अनिता सानप, प्रा.सोनाली इंगळे प्रा. पवार प्रा. सोळंकी प्रा.राजपूत, प्रा.सातपुते, प्रा. म्हस्के, प्रा.नागरे, प्रा. देशमुख सर्व कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी, तसेच शिक्षक वृंद हजर होते.व समर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची प्राचार्य सचिन घुगे यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये