ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मेंडकी येथे शालेय नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

तालुक्यातील मेंडकी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आज पहिल्या दिवशी १ ली च्या विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तक, शालेय दप्तर व पुष्पगुच्छ देवून माजी सदस्य पंचायत समिती ब्रम्हपुरी डॉ.थानेश्वर कायरकर यांच्या हस्ते नवगत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

           ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेत जाऊन शिक्षण घ्यावे.आपल्या परीसरातील आजुबाजुला कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असेल तर गावातील शाळेच्या शिक्षकांना माहिती द्यावी.प्राथमिक शाळेतील पहिले दिवस हा प्रत्येक पालक आणि विद्यार्थींसाठी खूप खास असतो कारण हा फक्त विद्यार्थीच नाही तर त्यांच्या आयुष्यातील एका नव्या आणि रोमांचकारी अध्यायाची देखील सुरुवात असते असे प्रतिपादन यावेळी माजी सदस्य पंचायत समिती ब्रम्हपुरी डॉ.थानेश्वर कायरकर यांनी केले.

        याप्रसंगी मेंडकी ग्रामपंचायत सरपंच सौ मंगला ईरपाते, माजी सभापती पंचायत समिती ब्रम्हपुरी सौ वंदना शेन्डे, पंचायत समिती ब्रम्हपुरी गटशिक्षणाधिकारी मयुर लाडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भुपाल खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संजय पगाडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चौधरी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबोरकर, शाळेचे मुख्याध्यापक तलमले, सर्व सहाय्यक शिक्षक, शिक्षीका व बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये