ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची भरारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाद्वारे नुकताच घोषित करण्यात आलेल्या २०२५ च्या पॉलिटेक्निक परीक्षेत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक, बेटाळा येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.

तृतीय वर्षाच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील कुलक्ष्मी तोंडरे 84.68 टक्के घेऊन प्रथम आली तर परीक्षेत विद्युत शाखेतील गौरव मंगर 84.56 टक्के घेऊन द्वितीय आला,द्वितीय वर्षातील ज्ञानेश्वर थलाल याने 89 टक्के घेऊन द्वितीय वर्षांत पहिले स्थान पटकावले,निकिता शेंडे इने 86 टक्के घेत द्वितीय स्थान पटकावले.प्रथम वर्षाचा एकूण 92 टक्के ,द्वितीय वर्षाचा 86 टक्के तर अंतिम वर्षाचा 94 टक्के निकाल लागला.

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कॉलेजच्या अध्यक्ष श्री देवेंद्र पिसे प्राचार्य सुयोग बाळबुधे प्रा. नरेंद्र समर्थ, प्रा.गिरीश साखरे,प्रा. असद शेख, प्रा. राहुल उके व समस्त प्राध्यापक वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये