वीर बिरसा मुंडा इंग्रजांविरुद्ध लढा देणारे थोर क्रांतिसुर्य : विवेक बोढे
मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात वीर बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट
घुग्घुस: येथील मा.ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सोमवार, ९ जुन रोजी सकाळी आदिवासी जननायक, क्रांतिसूर्य, वीर बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, आदिवासी जननायक, क्रांतिसूर्य, वीर बिरसा मुंडा हे इंग्रजांविरुद्ध लढणारे थोर क्रांतिसुर्य होते. त्यांनी आदिवासिंच्या हक्कासाठी इंग्रजांविरुद्ध लढा दिला. ‘उलगुलान’ चे मोठे आंदोलन सुरु केले. ज्यात आदिवासिंनी इंग्रज सरकारविरोधात बंड केले. शहीद वीर बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिन ९ जुन रोजी साजरा केला जातो. या दिवशी वीर बिरसा मुंडा यांच्या हौतात्म्याची आठवण केली जाते.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, डॉ. सुर्यभान वासेकर, निखिल आत्राम, मंगेश उलमाले, गौरव तुराणकर, निशा उरकुडे, प्रीती धोटे, खुशबू मेश्राम, भारती परते, स्वाती गंगाधरे, प्रिया नागभिडकर, जाई आत्राम, नेहा कुम्मरवार आदींची उपस्थिती होती.