ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रेल्वेतून पडून अज्ञात युवकाचा मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
रेल्वेतून पळून एका अज्ञात 25 ते 30 वर्ष वयाच्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील रेल्वे स्टेशन जवळील गणेश मंदिराच्या मागच्या परिसरातील रेल्वे लाईन वर उघडकीस आली.
सदर मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही. सदर युवकाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. सदर घटनेचा पंचनामा भद्रावती पोलिसातर्फे करण्यात आला असून सदर मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
मृतकाची माहिती मिळाल्यास भद्रावती पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.