उद्या गोंडवाना विद्यापीठ, ‘पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे उदघाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” अध्यासन केंद्राचे उदघाटन दिनांक ३१ मे २०२५ रोज शनिवारला,दुपारी ४.०० वाजता, प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशती जन्मशताब्दी समारोह समापन प्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
डॉ. प्रशांत बोकारे,कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या उदघाटन समारंभात प्रमुख अतिथी अँड. रविंद्जी भागवत,जेष्ठ विधिज्द,चंद्रपूर, डॉ. श्रीराम कावळे, प्र-कुलगुरू ,डॉ. मंगेश गुलवाडे,अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशती जन्मशताब्दी समारोह समिती प्रस्तावक गुरुदास कामडी,व्यवस्थापन परिषद-अधिसभा सदस्य यांच्या प्रमुख क्षउपस्थितीत संपन्न होत आहे.
उदघाटन समारंभाचे प्रमुख वक्ता श्रध्दा मौर्य,वीर रस ,कवयीत्री, नागपूर यांचे मार्गदर्शन होणार आहे.या कार्यक्रमासाठी मन:पूर्वक आमंत्रित करीत आहोत.
महाराष्ट्राच्या महान स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व त्यांचं विचारधन समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सदर अध्यासन स्थापन करण्यात आले आहे.असे प्रस्तावक गुरुदास कामडी यांनी सांगितले.