ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातून अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीचे ताब्यातून माल जप्त

एकूण 1 लाख 65 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 24/05/2025 रोजी स्था. गुन्हे शाखा वर्धा तर्फे पो. स्टे. सेवाग्राम हद्दीतील नाकेबंदी केली असता नमूद आरोपी 1) गौरव लिलाधरराव जाबुतकर, वय 35 वर्ष, रा. प्लॉट नंबर 179, वैभव नगर, दिघोरी उमरेड रोड, जिल्हा नागपुर हा त्याचे ताब्यातील मोपेड जुपिटर गाडीवर वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूची वाहतूक करताना मिळून आला त्याचे ताब्यातून 1) रॉयल स्टॅग कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 15 काचेच्या सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 3507 दिनांक 05.02.25 असा असुन प्रती नग 350 रू. प्रमाणे 5,250/- रू. 2) रॉयल स्टेंग कंपनीच्या 375 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 06 काचेच्या सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 063 दिनांक 17.04. 25 असा असुन प्रती नग 700 रू. प्रमाणे 4,200 /- रू., 3) रॉयल स्टेंग बॅर कंपनीच्या 180 एम्.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 12 काचेच्या सिलबंद शिश्या ज्यावर बेंच नंबर 430 दिनांक 17.04.25 असा असुन प्रती नग 400 रू. प्रमाणे 4,800/- रु. 4) रॉयल ग्रिन कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 12 सिलबंद शिश्या दिनांक 16.04.25 असा असुन प्रती नग 350 रू. प्रमाणे 4,200/- रू. 5) रॉयल ग्रिन कंपनीच्या 375 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 03 सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 004 एप्रील 25 असा असुन प्रती नग 700 रू. प्रमाणे 2,100/- रू. 6) ऑफीसर चॉईस कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 29 सिलबंद शिश्या ज्यावर बँच नंबर 640 दिनांक 04.04.25 असा असुन प्रती नग 300 रू. प्रमाणे 8,700/- रू. 7) ऑकस्मीत सील्वर कंपनीच्या 180 एम. एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 15 सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 2 बी.नं. 017 एम.एफ.डी. दिनांक 16.05.25 असा असुन प्रती नग 400 रू. प्रमाणे 6,000/- रू. 8) ऑकस्मीत सील्वर कंपनीच्या 375 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 15 सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर एम.एच. 1 बी.नं. 009 एम.एफ.डी. दिनांक 25.04.25 असा असुन प्रती नग 800 रू. प्रमाणे 2,400/-रू. 9) बडवाझर मॅग्नम कंपनीच्या 500 एम.एल.च्या बिअर दारूने भरलेल्या 24 सिलबंद टिन ज्यावर बॅच नंबर 152 दिनांक 04. 05.25 असा असुन प्रती नग 350 रू. प्रमाणे 7,000/- रू. 10) मॅजीक मुव्हमेंट कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 04 सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 1200 मार्च 25 असा असुन प्रती नग 350 रू. प्रमाणे 1,400/- रू. 11) ऑफीसर चॉईस ब्ल्यु कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 27 सिलबंद शिश्या ज्यावर बेंच नंबर 98 दिनांक 03.04.25 असा असुन प्रती नग 350 रू. प्रमाणे 9,450/- रू. 12) रॉयल चॅलेंजर कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 12 सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 016 दिनांक 29.04.25 ची 01 शिशी तसेच बॅच नंबर 64 दिनांक 30.04.25 चे 11 शिश्या असा असुन प्रती नग 350 रू. प्रमाणे 4,200/- रू. 13) रॉयल ग्रिन कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 09 प्लॉस्टीक सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 247 फेब 25 प्रती नग 350 रू. प्रमाणे 3,150/- रू. 14) ऑयकॉनी वाईट कंपनीच्या 180 एम.एल.च्या विदेशी दारूने भरलेल्या 09 सिलबंद शिश्या ज्यावर बॅच नंबर 619 दिनांक 23.03.25 असा असुन प्रती नग 300 रू. प्रमाणे 2,700/- रू. 15) एक ग्रे रंगाची टी.व्ही.एस. कंपनीची ज्युपीटर ज्यावर दोन्ही बाजुस क्रमांक एम.एच. 49 सी.एच. 7243 मोपेड गाडी किमंत 1,00,000/- रूअशा वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या शिश्या असा वाहनासह एकूण जुमला किंमत 1,65,550/ रू. चा माल मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त केला. आरोपी क्रं 01 यास विचारणा केली असता त्याने आरोपी क्रं 02 कशीश वाईन शॉपचा नोकर, रा. ताजबाग रोड, जिल्हा नागपुर याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिल्याने पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे कलम 65 (अ) (ई), 77(अ) 83, म.दा.का सह कलम 3 (1), 181,130/177 मोवाका कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

 सदरची कारवाई मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री विनोद चौधरी, पोलीस अंमलदार गजानन लामसे, रितेश शर्मा, गोपाल बावणकर, मंगेश आदे, दिपक साठे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये