देऊळगाव राजा येथे काँगेस पक्षाच्या वतीने काढण्यात आली तिरंगा यात्रा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ऑपरेशन सिंदुर मधील शुर विर जवानांना अभिवादन करण्यासाठी तसेच माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या स्मृति दिनी 21 मे रोजी सकाळी 10वाजता काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा चे आयोजन देऊळगाव राजा येथे कऱण्यात आले. तिरंगा यात्रा बस स्थानक चौकातून निघून शहरातील प्रमुख मार्गानें भ्रमण करीत अमर जवान चौक येथे विसर्जित करण्यात आली यावेळी स्व राजीव गांधी तसेच शहीद झालेल्या जवानांना व मृतक पर्यटकांना दोन मिनिट स्तब्ध राहून श्रध्दांजली वाहण्यात आली, कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता झाली.
यावेळी वीर जवान अमर रहे, राजीव गांधी अमर रहे, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, जय जवान जय किसान च्या घोषणा देण्यात आल्या,तिरंगा यात्रा मध्ये काँगेस पक्षाचे नेते सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश दादा कायंदे, अनिल सावजी, रामदास डोईफोडे, हनीफ शहा, अतिश कासारे, अयुब शहा, डॉ इक्बाल कोटकर, गजानन तिडके,प्रा. अशोक डोईफोडे, माजी सैनिक भिमराव चाटे,रामेश्र्वर वायाळ, एकनाथराव खेडेकर, दिलीप गाडेकर, शौकत अली, मलकप्पा लंगोटे, मुबारक खान, मुन्ना ठाकूर, अशोक झिने, पंडीत राजे जाधव, सय्यद इरफान, दिपक महाले, गणेश सानप, रमेश केवट,तथा इतर नागरिक सहभागी झाले होते.