ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक करोड देवुन जिजाऊ माँ साहेबांचा आशिर्वाद घ्यावा… – वासुदेव कोकाटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

लोकप्रतिनिधी म्हंटला की धष्टपुष्ट पोट सुटलेले व्यक्तीमत्व डोळ्यासमोर येते. त्याला कारणही तसेच आहे. भोळ्याबाबड्या जनतेची मते विकत घेऊन, दारुच्या बाटल्या वाटून तो जनतेचा सेवक बनतो. कुठून येते ही करोडोची संपत्ती. निवडुन येताच तोंड मारत प्रत्येक कार्यालयातील विकासनिधी खात सुटतो. शिक्षणासारख्या पवित्र कार्यालाही त्याने सोडले नाही. इंजिनिअरींग कॉलेज यांचेच इंग्लिश कॉनव्हेंट यांनीच काढुन खोऱ्याने पैसा ओढुन स्वतःचे महाल बांधले. करोडो रुपये पोटात रिचविले. संपत्ती कुठे असेल तर आमदार-खासदार यांचेजवळ.

आज जिजाऊ माँ साहेब छत्रपती शाहु महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे धुनिवाले मठाजवळ शिल्प लावण्यासाठी सामान्य शिवभक्तांना आंदोलन करण्याची वेळ यावी हे आपले दुर्देव आहे. शिवभक्तांनी आता एकच करावे या जनसेवकांकडुन 1 करोडची संपत्ती वसुल करण्यासाठी त्यांच्या घरासमोर भिक माँगो आंदोलन करुन या महान आपल्या दैवतांचे शिल्प लावावे आणि ते पैसे वसुल होतपर्यंत या ठिकाणाहुन न हटता आंदोलनाऐवजी लोकप्रतिनिधींना धारेवर धरावे असे स्पष्ट प्रतिपादन कृषिसेना या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष वासुदेव कोकाटे म्हणाले.

स्वच्छता राबविणारे मजुर गेल्या 14 दिवसापासुन नगरपालिकेसमोर उपोषणाला बसुन असतांना त्यांच्या मंडपासमोर या आमदाराचे चकचकीत वाहन फिरवुन त्या मजुर वर्गाला वाकुल्या दाखवत आहे. म्हणुन आज या मजुरांना घेऊन हिंगणघाटचे आमदार समिर कुणावार यांची भेट घेवुन कोठेकरांना सांगुन गरिबांच्या भुकेची काळजी घ्यावी अशी विनंती केली.

जर दोन दिवसांत त्यांना कामावर घेण्याचा निर्णय कोठेकरांनी न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची हाक दिली.

वासुदेव कोकाटे

जिल्हा प्रसिध्दी प्रमुख

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये