ताज्या घडामोडी

स्व. भाऊराव पाटील चटप प्राथमिक माध्यमिक तथा स्व. संगीता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथे प्रजासत्ताक दिन व पालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट –

प्रमोद गिरडकर

स्व ,भाऊराव पाटील चटप प्राथमिक व माध्यमिक स्व, संगीता चटप उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरपना येथे 26 जानेवारी ला ध्वजारोहण 75 वा प्रजासत्ताक दिन व पालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ,याप्रसंगी पालक मेळावा मध्ये शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य खडसे सर यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करीत असताना उन्हाळी सुट्ट्यामध्ये 9 वी मधून 10वी व 11वी मधून इयत्ता १२ वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यानंतर उन्हाळी विशेष शिकवणी वर्गाला विद्यार्थी उपस्थित ठेवण्याविषयी व 10 वि 12 वि नियोजनाबाबत 10 वी 12 वी नंतर अभ्यासक्रम करिता दारे खोली होतात सदर योजना बोर्डाच्या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांच्या गुणवता साठी उपयुक्त ठरेल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले ,त्याचबरोबर भविष्यवेधी प्रणालालीचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना व पालकांना दाखवण्यात आले, यावेळी विषय मित्रांचे प्रस्तुतीकरण पालका पुढे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा, मनोहरराव चटप ,उद्घाटक प्रमुख विजयराव बावणे सीडीसी बँक चंद्रपूर, प्रमुख अतिथी व मार्गदर्शन मा वानखडे सर ,शाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक आडकिने सर , कार्यक्रमाचे वक्ते मा, पेदेवाड सर शिक्षक तज्ञ ,यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर मार्गदर्शन केले यानंतर शाळेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यावेळी शाळेचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेण्यात आला यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाला पालक उपस्थित होते या पालक मेळावा व संस्कृतीक कार्यक्रमाला यशस्वी साठी सर्व शिक्षक शिक्षिका व अधीक्षक सर्व कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये