डोंगरापेक्षाही अफाट शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असताना केवळ अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रच का – सावन चुडीवाल
बी जे एस व डी आर एच एस यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना देण्यात आले शैक्षणिक सुविधा बाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भारतीय जैन संघटना व देऊळगाव हायस्कूल देऊळगाव राजा यांचे संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात शिक्षणाच्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहे यासाठी शैक्षणिक सुविधा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते यावेळी संभाजीनगर येथील सावन चुडीवाल या मार्गदर्शकांनी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की या भारत देशात डोंगरापेक्षाही अफाट अशा वेगवेगळ्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहे विद्यार्थ्याने आपल्याला नेमकं कोणतं क्षेत्र निवडायचा आहे याचा सखोल अभ्यास करूनच या आयुष्याच्या टर्निंग पॉईंट वर निर्णय घ्यावयास हवा केवळ अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधे व्यतिरिक्त खूप काही सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी डी आर एच एस चे सचिव सुबोधभाऊ मिस्त्रीकोटकर, संचालक सुमेर सावजी डोणगावकर, संस्थेचे प्राचार्य रंगनाथ कोल्हे, पर्यवेक्षक जाधव, प्रा.गजानन गाडेकर, बी जे एस चे राज्य कार्यकारणी सदस्य सन्मती जैन, चॅप्टर अध्यक्ष पियुष खडकपूरकर, नंदन दर्यापूरकर, सतेज डोणगावकर, उपस्थित होते.
या मार्गदर्शन शिबिरात जवळपास एक हजार विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला अधिक मार्गदर्शन करताना सावन चुडीवाल यांनी सांगितले की या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला टार्गेट ठरवून क्षेत्र निवडावे लागणार आहे उपलब्ध असलेल्या प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी हा त्याच्या गुणवत्तेनुसार चमकू शकतो कला, विज्ञान व वाणिज्य यामध्ये काय काय उपलब्ध आहे विज्ञान मध्ये सुद्धा खूप काही शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत केवळ अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणच का असा प्रश्न त्यांनी करून एन डी ए मधून पायलट व्हा मुलींनी नर्सिंग कडे वळा वाणिज्य मध्ये आता नव्याने अकाउंटिंग च्या व्यतिरिक्त खूप काही उपलब्ध आहे सोबतच गेल्या वर्षापासून दहावीनंतर डिप्लोमा साठी आता खास करून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आर्किटेक्चर ची सुविधा उपलब्ध झालेली आहे कला शाखेतून पत्रकारिता करिता मास्क कम्युनिकेशनची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे योग्य वेळी योग्य व्यासपीठ मिळाल्यास विद्यार्थी आपले करिअर चांगल्या प्रकारे घडवू शकतो असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य गजानन गाडेकर तर आभार बी जे एस चे सन्मती जैन यांनी मानले.