ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गडचांदुर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंती निमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सावित्रीबाई फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गडचांदुर तालुका कोरपना जि चंद्रपूर येथे आज शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक आठ वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती निमित्त अभिवादन तथा त्यांच्या कार्य विचारांवर विविध उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ महाविद्यालय विभागप्रमुख श्री प्रशांत खैरे तथा अध्यक्ष म्हणून प्राचार्य श्री महेंद्रकुमार ताकसांडे तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दिनकर झाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपीक श्री. एल.पी.मत्ते यांनी केले,सदर कार्यक्रमासाठी नितीन सुरपाम डॉ. राजेश बोळे,अशोक सातारकर जहीर सय्यद ताकसांडे,कोल्हे, शेंडे, मरसकोल्हे गहुकर, आडे,पिंपळशेंडे तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये