ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ठाणेदार संतोष ताले यांनी केले अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

भारत देशाचे संविधान लिहिणारे भारताचे पहिले कायदेमंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण होवून 69 वर्ष पूर्ण झालेले आहेत यानिमित्ताने 6 डिसेंबर 2025 रोजी पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेले आहेत.

यानंतर पोलिस स्टेशन वर्धा शहर पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड यांनी सुध्दा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेले आहेत यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी सचिन भालशंकर अभिजित वाघमारे महेन्द्र डेकाटे नम्रता लोखंडे पूनम ठाकरे इत्यादी मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये