ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अर्णव पाथ्रीकर नॅशनल लेवल टॉपर.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

स्कूल ऑफ स्कॉलर चा के. जी. 2चा विद्यार्थी मास्टर अर्णव अभिषेक पाथ्रीकर स्पेल वेल इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत ऑल इंडिया लेवल ला टॉपर चॅम्पियन ठरला असून. त्याला रोख रक्कम, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह प्रदान करण्यात येईल.

स्कूल चे प्रशासकीय अधिकारी सुमित बोकाडे,प्राचार्या मनिषा उंबरकर, पर्यवेक्षिका नयना पाटील मुलक, वर्गशिक्षिका हर्षा इंगळे, यांनी व सर्व स्टाफ ने त्याचे अभिनंदन केले आहे.

अर्णव हा माहेर कलेक्शन चे संचालक अभिषेक पाथ्रीकर, सौ. रेणू पाथ्रीकर यांचा मुलगा तसेच सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष पाथ्रीकर, सेवानिवृत्त प्राचार्या प्रतिभा पाथ्रीकर यांचा नातू आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये