ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालय, गडचांदूर येथे आर्थिक साक्षरता व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

एक्सलन्स ग्लोबल स्किल्स व महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता, शैक्षणिक व प्रेरणादायी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ५ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम आंतरिक तक्रार निवारण समिती (Internal Complaint Committee) ऑनलाइन माध्यम द्वारे आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात प्रमुख प्रशिक्षक म्हणून कॉर्पोरेट ट्रेनर सौ. रुचिका चांडक यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवस्थापन, मालमत्तेचे नियोजन, सायबर गुन्ह्यांपासून बचाव तसेच करिअरमध्ये आर्थिक साक्षरतेचे महत्त्व यावर मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. शैलेश दा. देव (प्राचार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, तर सहसंयोजक म्हणून प्रा. चेतन वैद्य (समन्वयक आय.सी.सी) यांचे विशेष सहकार्य लाभले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, आणि ५३ विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी भविष्यातील प्रशिक्षणासाठी गुंतवणुकीचे विविध पर्याय, कर नियोजन आणि संपत्ती व्यवस्थापन या विषयांवर अधिक सविस्तर मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये