योग कोसरे याची इन्स्पायर अवार्ड मानक २०२५ साठी निवड
विश्वशांती विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
शालेय मुलांमध्ये सृजनशील आणि रचनात्मक विचारांची संस्कृती विकसित करण्यासोबतच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक गरजांना पूर्ण करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे दरवर्षी इन्स्पायर अवार्ड मानक हा उपक्रम वर्ग सहावी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविला जातो.त्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रथम क्रमांक प्राप्त विश्वशांती विद्यालय सावली येथील वर्ग ०९ चा विद्यार्थी योग रविकांत कोसरे याची इन्स्पायर अवार्ड मानक २०२५ साठी जिल्हास्तरावर निवड झालेली असून त्याकरिता त्याला भारत सरकारकडून १०००० रुपये रोख पारितोषिक प्राप्त झाले.त्याच्या यशासाठी विषय शिक्षक प्रथमेश वारजूरकर,विज्ञान शिक्षक प्रा.धनंजय गुरनुले,प्रा.भुजंग आभारे सहाय्यक शिक्षिका प्रणोती सोनुले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
योग यांची जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक मधुकर जाधव तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.