गावाने पुरुषांचेही मेळावे आयोजित करून उदबोधन करावे – पारोमिता गोस्वामी
महिला दिनाचे औचित्य ; जि.प.उच्च प्राथमिक शाळेचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
गावाने, स्वयंसेवी संस्थेने किंवा युवक मंडळांनी गावातील पुरुषांचे मेळावे आयोजित करून त्यांचे उदबोधन करावे त्यांच्या सवयी, संस्कार त्यांच्या सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांची सामाजिक बांधिलकी याविषयी त्यांना मार्गदर्शन करून समाजात एक चांगला व्यक्ती म्हणून त्याचा वावर होईल त्यासाठी गावातील सर्व पुरुषांचे वेळोवेळी मेळावे घेऊन उदबोधन करावे असे मौलिक विचार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फिस्कूटी येथे आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्याने आयोजित महिला मेळाव्याच्या पहिल्या सत्रात त्यांनी व्यक्त केले.
पुरुषांचे व्यसन अलीकडे महिला अंगीकारत आहेत. यातून अनेक कुटुंबात समस्या निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. कुटुंबात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून पुरुषांपेक्षाही जास्त ती कौटुंबिक व सामाजिक जबाबदारी पार पाडत असते. अशावेळी स्त्रियांनी आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत असतानाच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तसेच स्वतः स्वावलंबी बनून निर्भर व्हायला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
आधुनिक काळात कुटुंबात व समाजात महिलांची जबाबदारी वाढत असल्याने कुटुंब सांभाळताना महिलांनी छोटे छोटे लघुउद्योग उभारून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक दर्जा सुधारावा व त्यातून कुटुंबाला आत्मनिर्भर बनवावे असे विचार कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ सोनीया नितीन गुरुनुले यांनी व्यक्त केले तर महिलांनी मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देऊन लहान मुलांचे आरोग्य सुदृढ बनवावं असे विचार सौ शिंदे मॅडम यांनी व्यक्त केले.
महिला मेळाव्याच्या दुसऱ्या सत्रात महिला व विद्यार्थिनींसाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. होते यामध्ये गावातील महिलांनी व विद्यार्थिनींनी विशेष सहभाग नोंदवला यामध्ये त्यांनी स्वतः बनवलेल्या रुचकर पकवानांचे टाल लावून लोकांची मन जिंकले. उपस्थितानी महिलांच्या पक्वनांचा मनमुराद आस्वाद घेऊन महिलांना दाद दिली.
या महिला मेळाव्याचे संचालन कुमारी बबीता बोबडे, प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी रत्नमाला गेडाम तरआभार प्रदर्शन गिता साखरे यांनी केले. वैशाली पेंढारकर यांनी सुमधुर स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केलं.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापण समितीच्या अध्यक्ष सौ ज्योत्स्नाताई राऊत, त्यांचे सदस्य व पदाधिकाऱ्यासह शाळेतील शिक्षक प्रतिभा वाघमारे,श्री महेंद्र खोब्रागडे श्री देऊळवार सर व श्री विजय भोयर सर यांनी अथक परिश्रम घेतले
या मेळाव्यात गावातील सर्व महिला मंडळाच्या महिला,माता पालक संघाच्या महिला, गावातील सर्व विद्यार्थिनी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.