ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे महामानव म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर – सुधाकर मेश्राम

विश्वशांती विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा.शेखर प्यारमवार

    भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे दिनांक ०६ डिसेंबरला दलितांचे उद्धारक,विश्वरत्न,बोधिसत्व, भारतिय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

         महामानव डॉ.बाबासाहेबांनी आम्हाला माणूसपण दिलं,अधिकार दिले,जगण्याची उमेद दिली,कायद्याने सर्व प्रकारचे अधिकार दिले.भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही निर्माण करणारे महामानव म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर होय असे अध्यक्षस्थानावरून विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम बोलत होते.

    कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक अशोक लांजेवार आणि राजू केदार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर प्रकाश टाकला.तसेच मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी बोलक्या वाणीतून भाषणे आणि डॉ आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून,संजय ढवस,श्वेता खर्चे,किशोर संगिडवार उपस्थित होते.

              कार्यक्रमाचे संचालन विद्यालयाची सहाय्यक शिक्षिका काजल बारापात्रे तर आभार प्रनोती सोनुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये