ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयात मरणोत्तर नेत्रदान जनजागृती विषयावर मार्गदर्शन 

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

-शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मरणोत्तर नेत्रदान जनजागृती या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामीण रुग्णालय गडचांदूर चे डॉ. प्रवीण येरमे हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा .डॉ. संजय गोरे हे होते प्रमुख अतिथी म्हणून डॉ. घुले ,प्रा.मंगेश करंबे उपस्थित होते

याप्रसंगी डॉ. प्रवीण येरमे यांनी नेत्रदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येक नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले तर डॉ. संजय गोरे यांनी नेत्रदान बाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी असे विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा .डॉ.शरद बेलोरकर यांनी केले या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विभगाचे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये