यशवंतराव शिंदे विद्यालयात माझी वसुंधरा अभियान
नगरपरिषद भद्रावतीचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये नुकतच माझी वसुंधरा अभियान या आधारावर नगरपरिषद भद्रावती भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने सुनीताताई खंडाळकर, वर्षाताई पडाल ,सोनू ताई चौधरी , विश्रांती ताई उराडे, श्रीमती स्वाती चारी , सुनिता ताई अडबोल. या चमूने पथनाट्य सादर केलं. वसुंधरेला कशाप्रकारे निरोगी ठेवता येईल या आधारावर हे पथनाट्य होतं.
हे पथनाट्य विद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर मोते यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयातील शिक्षक वृंद देशमुख सर, नंदनवार सर, पाटील सर, बनकर सर, कोल्हे सर, लांबट, सय्यद मॅडम, चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आपल्या वसुंधरेला कसं वाचवता येईल याचं ज्ञान विद्यार्थ्यांना या पथनाट्यामधून मिळालं. पथनाट्य सादर करणाऱ्या समूह प्राचार्य मोते सरांनी मनःपूर्वक आभार मानले. पुढील कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.