राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली पुरस्कृत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर, येथे विद्यार्थी विकास विभाग च्या वतीने व्यक्तिमत्व विकास शिबीर दिनांक 20 ते 23 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले. उद्घाटक सत्राचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए चंद्रमौली हे होते.
पहिल्या सत्रात व्यक्तिमत्व विकास व सकारात्मक दृष्टीकोन या विषयावर साधनव्यक्ती डाॅ. ओमप्रकाश सोनाने व दृतिय सत्रात ‘स्व ओळख व ध्येय निश्चीती’ या विषयावर डॉ. रामचंद्र वासेकर यांनी मार्गदर्शन केले. दुसरा दिवस पहिला सत्र यामध्ये 21 व्या शतकातील जीवनकौशल्य यावर नाहीद हुसेन तर दृतिय सत्रात आजचा युवक व भविष्यभान यावर पुनित मातकर यांनी मार्गदर्शन केले.
तिसरा दिवस पहिला सत्रात उच्च शिक्षणातील नव्या संधी याविषयावर डॉ. पंकज नरुले व दृतिय सत्रात व्यक्तिमत्व विकास व नेतृत्वकौशल्य या विषयावर प्रा. चंद्रकांत मनियार यांनी मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकास शिबीराचे समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ऐ.चंद्रमौली होते . समारोपीय कार्यक्रमाचे संचालन डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले तर तीन दिवसिय कार्यशाळाचा अहवाल सादर व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे समन्वयक डाॅ प्रफुल्ल वैराळे यांनी केले तर आभार डॉ. रागिनी पाटील, यांनी मानले.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच्या मोठ्या संख्येने सहभाग नोदविला या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ प्रफुल्ल वैराळे , डॉ रामचंद्र वासेकर , डॉ रागिनी पाटील यांचे सहकार्य लाभले.