चपराळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा शिवजन्मोत्सव समिती चपराळा यांच्या विद्यमाने तालुक्यातील चपराळा येथे ग्रामसफाई तथा घटस्थापनेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाला दिनांक 18 पासून सुरुवात करण्यात आली. या दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने गावात विविध धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात सामुदायिक ध्यान व ग्रामगीता वाचन, रांगोळी स्पर्धा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, भजन, सामुदायिक प्रार्थना, भारुड,शोभायात्रा आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय समितीतर्फे दिनांक 19 ला गावात शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.